Kharadi : महिनाभरापूर्वी ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात जखमी झालेल्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – खराडी येथे महिनाभरापूर्वी ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात जखमी झालेला तरुण पंकज खुणे (वय 26, रा.वर्धा) याचा काल शुक्रवारी (15 जून) तर तरुणी प्रियांका झगडे (वय 24) हिचा आज सकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.  

खराडीतील झेन्सार कंपनीजवळ शुक्रवारी (दि. 11 मे) 4.45 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर असणा-या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या स्फोटात चहा पिण्यासाठी टपरीवर थांबलेले पंकज खुणे आणि प्रियंका झगडे हे तरुण – तरुणी गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेत पंकज हा  70 % आणि प्रियंका ही जवळपास 40 % भाजली होती. या दोघांवर पुण्यातील सुर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर पंकजला आठवडाभराने वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. पंकज खुणे आणि प्रियंका दोघेही आयटी कंपनीत होते. महिनाभराच्या उपचारानंतरही प्रियंकाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा नव्हती. अखेर आज सकाळी सहाच्या सुमारास सुर्या हॉस्पिटलमध्ये प्रियंकाने अखेरचा श्वास घेतला. 

ट्रान्सफॉर्मरचा अपघात झालाच नव्हता – महावितरणचा दावा

दरम्यान, या दूर्घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणाच्या कारभारावर सर्व स्तरातून टीका झाली. मात्र, महावितरणने मात्र या दुर्घटनेतून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालाच नसून या ट्रान्सफॉर्मरच्या शेजारी असलेल्या सॅन्डविचच्या स्टॉलला आग लागली आणि ही दुर्घटना घडली, असे महावितरणने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, महावितरणचा हा अहवाल धाधांत खोटा असल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला होता. आपली चूक झाकण्यासाठी महावितरण खोटा अहवाल देत असल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केला आहे. 

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन अपघात घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पुणे विभागात अशा अनेक दुर्घटना होऊन सर्वसामान्य नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतरही महावितरणने हात झटकले आहेत. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालाच नसून  ट्रान्सफॉर्मर शेजारी असलेल्या सॅन्डविचच्या स्टॉलला आग लागली आणि ही दुर्घटना घडली, असे महावितरणने आपल्या अहवालात म्हटले आहे. पण जिथे हा ट्रान्सफॉर्मर आहे तेथील नागरिक मात्र स्फोट ट्रान्सफॉर्मरचाच झाला यावर ठाम आहेत. झालेली दुर्घटनेत पुर्णतः महावितरणचीच चूक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.त्यामुळे महावितरण मात्र आपली चूक झटकत असल्याचं बोललं जातंय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.