Dapodi : टँकरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 20) दुपारी चारच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी (Dapodi) येथे झाला.

Dehuroad : धक्कादायक! साडी नेसवण्यास आईने नकार दिल्याने 13 वर्षीय मुलीची आत्महत्या

मिंटूसिंग हिम्मतसिंग नारंग (वय 49) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हर्षमीत कौर मिंटूसिंग नारंग (वय 20, रा. रविवार पेठ, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टँकरचालक संतोष किसनराव होनराव (रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षमीत कौर यांचे वडील मिंटूसिंग हे बुधवारी दुपारी पुणे-मुंबई महामार्गावरून चिंचवड येथे कंपनीच्या कामानिमित्त जात होते. त्यावेळी दुपारी चारच्या सुमारास फुगेवाडी येथे चालक संतोष होनराव याच्या ताब्यातील भरधाव टँकरने मिंटूसिंग यांच्या दुचाकीला जोरात धक्का दिला. त्यामुळे मिंटूसिंग हे दुचाकीवरून खाली पडले.

त्यानंतर त्यांच्या डोक्यावरून टँकरचे चाक जाऊन ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.