Anandacha Shidha : जिल्ह्यात 73 टक्के कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’चे वितरण पूर्ण

एमपीसी न्यूज – शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती निमित्त चार शिधा जिन्नस असलेला आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वितरीत करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात बुधवार (दि. 20) अखेर 73 टक्के कुटुंबांना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे.

Dapodi : टँकरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रती शिधापत्रिका 1 संच ज्यामध्ये 1 किलो रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल असे एकूण 4 जिन्नस असलेला 1 संच 100 रूपये या दराने रास्तभाव दूकानातून वितरीत करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील 44 हजार 100 लाभार्थ्यांपैकी 30 हजार 890, बारामती तालुक्यात 83 हजार 950 लाभार्थ्यांपैकी 49 हजार 319, भोर तालुक्यात 26 हजार 800 लाभार्थ्यांपैकी 21 हजार 574, दौंड तालुक्यातील 52 हजार 100 लाभार्थ्यांपैकी 33 हजार 34, हवेली तालुक्यातील 21 हजार 950 लाभार्थ्यांपैकी 18 हजार 956, इंदापूर तालुक्यातील 67 हजार 145 लाभार्थ्यांपैकी 42 हजार 351 लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यातील 63 हजार 700 लाभार्थ्यांपैकी 54 हजार 418, खेड तालुक्यातील 57 हजार 350 लाभार्थ्यांपैकी 51 हजार 325, मावळ तालुक्यातील 36 हजार 850 लाभार्थ्यांपैकी 29 हजार 249, मुळशी तालुक्यातील 17 हजार 950 लाभार्थ्यांपैकी 14 हजार 633, पुरंदर तालुक्यातील 37 हजार 200 लाभार्थ्यांपैकी 28 हजार 367, शिरूर तालुक्यातील 46 हजार 150 लाभार्थ्यांपैकी 30 हजार 523, तर वेल्हे तालुक्यातील 7 हजार 550 लाभार्थ्यांपैकी 6 हजार 830 लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे.

उर्वरित लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास नजीकच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेखी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.