Aalandi : ग्रामीण रुग्णालया शेजारील कचरा संकलन केंद्र स्थलांतरीत करावे- मनसे

एमपीसी न्यूज- आळंदी येथील जुन्या ( Aalandi)  नगरपरिषद कार्यालगत तसेच आळंदी ग्रामीण रुग्णालया शेजारी शहरातील कचरा संकलन (मोठ्या वाहनां मध्ये) करून ठेवत पुढे प्रक्रिया करण्यासाठी नेला जातो.येथील कचरा संकलन केंद्रामुळे आळंदी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.नातेवाईकांना,कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना सुध्दा येथील दुर्गंधी चा नाहक त्रास होत असतो.यासंदर्भातील निवेदन आळंदी ग्रामीण रुग्णालयाने देखील पालिका प्रशासनास दिले आहे .

chinchwad – बहुरूढींचे दर्शन म्हणजे भारूड!” फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प पाचवे

तेथील कचरा संकलन केंद्र दुसरीकडे स्थलांतरीत करावे.रुग्ण ,नातेवाईक व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन जनहितार्थ मागणीचा विचार करून कार्यवाही व्हावी.अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याबाबत चे निवेदन रस्ते साधन सुविधा व अस्थापनाचे खेड तालुका उपाध्यक्ष किरण नरके यांनी रस्ते साधन सुविधा व आस्थापना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य योगेश परुळेकर,रस्ते साधन सुविधा व आस्थापना चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  सचिन  भांडवलकर  व पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश  लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना देण्यात आले. यावेळी मनसे चे सहदेव गोरे,परमेश्वर बरबडे उपस्थित होते.याबाबत माहिती किरण नरके यांनी ( Aalandi)  दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.