AAP : चेतन बेंद्रे आपमधून निलंबित, कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांना 1 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. बेंद्रे यांनी एका (AAP) कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. आपचे राज्य उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी ही कारवाई केली. दरम्यान, राज्य सचिन धनंजय शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपने मनोहर पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा ‘बी’ फॉर्म अपूर्ण असल्याने  पाटील यांचा अर्ज बाद झाला. पाटील यांना एबी फॉर्म कोरा देण्यात आला. तसेच 10 अनुमोदकांच्या सह्या न घेता फॉर्म भरण्यात आला. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला. त्यामुळे चेतन बेंद्रे यांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Maval Crime News : मावळात गांजासह तरुणाला अटक

तसेच राज्याचे सचिव धनजंय शिंदे यांची एबी फॉर्म देण्याची जबाबदारी असताना व स्वत: हजर असताना हा प्रकार घडल्यामुळे आप पक्षाची महाराष्ट्रामध्ये नाहक बदनामी झाली. यामुळे त्यांना (AAP) नोटीस देण्यात आली. स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत विचारणा केली असता चेतन बेंद्रे यांनी धनंजय शिंदे यांच्या समक्ष बिराजदार या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

”चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मनोहर पाटील हे आपचे उमेदवार होते. त्यांना कोरा एबी फॉर्म दिला. त्यावर त्यांचे नाव लिहिले नाही. फॉर्मवर दहा जणांचे नाव, नंबर लिहिले. पण, स्वाक्ष-या घेतल्या नाहीत. म्हणजे हे सगळे जाणीवपूर्वक, फॉर्म बाद झाला पाहिजे यासाठी केले की काय, असा प्रश्न आहे. त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावर कारवाई केली आहे.

एक वर्षासाठी निलंबित केले आहे. राज्याचे सचिव धनंजय शिंदे हे तिथे हजर होते. त्यांच्यासमोर हा प्रकार झाला. कोरा फॉर्म देण्याचा त्यांना अधिकार नाही, तरीही कोरा फॉर्म देण्याची चूक केली. कार्यकर्त्यांनी अर्जावर स्वाक्ष-या का घेतल्या नाहीत असे विचारले असता चिडून चेतन बेंद्रे यांनी एका (AAP)कार्यकर्त्याला मारहणा केली. यामुळे पक्षाची बदनामी झाली. उमेदवारी अर्ज बाद झाला. हा दुर्लक्ष करण्यासारखा प्रकार नव्हता. त्यामुळे कारवाई केल्याचे” आपचे प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले.

मारहाण केल्याचा आरोप फेटाळत चेतन बेंद्रे म्हणाले, ”मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ते आहे. राज्य समितीकडून जो काही निर्णय येईल. तो मला मान्य राहील. मी पक्षाची अधिकृत भूमिका येण्याची वाट बघत आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.