Abhyudaya Bank : अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; रिझर्व्ह बँकेकडून प्रशासकाची नेमणूक

एमपीसी न्यूज – दैनंदिन प्रशासनात त्रुटी आढळल्याने (Abhyudaya Bank ) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ 12 महिन्यांच्या कालावधीसाठी बरखास्त केले आहे. तसेच आरबीआयने बँकेवर प्रशासकाची तसेच सल्लागार समितीची नेमणूक केली आहे. संचालक मंडळ बरखास्त केले असले तरी याचा बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने सांगितले आहे.

भारतीय स्टेट बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची अभ्युदय बँकेच्या प्रशासक पदावर नियुक्ती केली आहे. पुढील 12 महिन्यांच्या कालावधीसाठी सत्य प्रकाश पाठक हे बँकेचा संपूर्ण कारभार पाहणार आहेत. पुढील 12 महिन्यांच्या कालावधीत बँकेच्या कारभारात सुसूत्रता आणून बँकेचे कार्याचालन व्यवस्थित ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी पाठक यांच्याकडे असणार आहे.

Pune : महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांनी काढली अभिवादन मिरवणूक

अभ्युदय बँकेचे प्रशासक सत्य प्रकाश पाठक यांना कामकाजात मदत करण्यासाठी आरबीआयने सल्लागार मंडळाची देखील नियुक्ती केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी महाव्यवस्थापक वेंकटेश हेगडे, सनदी लेखापाल महेंद्र छाजेड आणि कॉसमॉस को ऑपरेटीव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा या सल्लागार समितीमध्ये समावेश आहे.

आरबीआयने बँकेच्या व्यवसायावर कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत. त्यामुळे अभ्युदय बँकेच्या खातेदारांना काळजी करण्याचे कारण नाही. बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वेळेवर होणार आहे. केवळ प्रशासकीय कामकाजात अनियमितता आढळून आल्याने आरबीआयने ही कारवाई केली (Abhyudaya Bank ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.