Railway : पुणे-लोणावळा दरम्यान प्रत्येक किलोमीटरवर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा

एमपीसी न्यूज – खडकी ते शिवाजीनगर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान स्वयंचलित (Railway)  सिग्नलचे काम करण्यासाठी रेल्वेने रविवारी ब्लॉक घेतला. त्यात महत्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे. तसेच खडकी रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रोनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित केल्याने सिग्नलमध्ये होणारे बिघाड आता होणार नाहीत.

पुणे-लोणावळा दरम्यान 42 उपनगरीय रेल्वे धावतात. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या यामुळे पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वेमार्गावर मोठा ताण असतो. एखादी एक्सप्रेस रेल्वे सोडण्यासाठी लोकल गाड्या अथवा मालवाहतूक गाड्यांना लूप लाईनवर ठेवले जाते. यामुळे या लूप लाईन वरील गाड्या विलंबाने धावतात.

Abhyudaya Bank : अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; रिझर्व्ह बँकेकडून प्रशासकाची नेमणूक

पूर्वी ॲब्सोल्युट ब्लॉक सिग्नलिंग ही प्रणाली होती. या प्रणालीमध्ये दोन स्थानकांच्या दरम्यान एका दिशेने एकच रेल्वे धावत होती. ती रेल्वे जोपर्यंत पुढच्या स्थानकाच्या पुढे जात नाही तोपर्यंत पाठीमागून दुसरी रेल्वे सोडली जात नसे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना उशीर होत असे.

रेल्वेचे परिचालन सुधारण्याच्या हेतूने मागील काही महिन्यांपासून रेल्वे विभागाने पुणे लोणावळा दरम्यान स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले होते. ते काम खडकी पर्यंत पूर्ण झाले होते. खडकी ते पुणे हा भाग स्वयंचलित सिग्नल यंत्रणेने जोडण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आला. आता हा भाग देखील जोडला गेल्याने पुणे ते लोणावळा दरम्यान 61 सिग्नल खांबांवर स्वयंचलित सिग्नल प्रणाली बसवण्यात आली आहे.

एक रेल्वे एक किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर त्यानंतर लगेच दुसरी रेल्वे सोडता येणार आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने विलंबाने धावणाऱ्या रेल्वेंची संख्या कमी होऊन लोहमार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार (Railway)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.