Pune : महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांनी काढली अभिवादन मिरवणूक

एमपीसी न्यूज – ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि आझम कॅम्पसमधील संलग्न ( Pune) संस्थांच्या  वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या अभिवादन मिरवणुकीत  10 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

ही मिरवणूक आज (मंगळवारी) सकाळी साडेसात पासून  आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) ते महात्मा फुले वाडा मार्गावर काढण्यात आली.  मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ. पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव इरफान शेख, शाहीद इनामदार, मशकूर शेख, साबीर शेख, सिकंदर पटेल, आसीफ शेख,वाहिद बियाबानी, गौस शेख अब्दुल वहाब, युसुफ शेख, प्राचार्य, मुख्याध्यापक, कर्मचारी सहभागी झाले.

Moshi : एक दीप पर्यावरणासाठी उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा

महात्मा फुलें, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांच्या वेशातील विद्यार्थी बग्गीत बसले होते.दरबार ब्रास बँड,बग्गी, बैलगाडी,महात्मा फुलेंचे सामाजिक संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी,पदाधिकारी,शिक्षक,प्राध्यापक सहभागी झाले. विविध क्षेत्रातील यशस्वी आणि प्रेरक महिलांची वेशभुषा परिधान केलेल्या दहा  विद्यार्थिनी या मिरवणुकीचे आकर्षण ठरल्या.

अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे 19 वे वर्ष होते. दरवर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’( आझम कॅम्पस)च्या वतीने   छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या ( Pune) जातात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.