Moshi : एक दीप पर्यावरणासाठी उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित रविवारी सायंकाळी मोशी प्राधिकरण मधील (Moshi ) संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व परिसरातील पर्यावरण प्रेमी व मंडळे यांच्या सहकार्याने ‘ एक दीप पर्यावरणासाठी ‘ या उपक्रमाअंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशन शेजारील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी  भुषण खंदारे याने पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या रांगोळ्या देखील काढल्या होत्या.

या कार्यक्रमाला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ ,उपनिरीक्षक अंगद , माजी नगरसेवक विक्रांत लांडे , जेजुरी खंडेराय देवस्थानचे अध्यक्ष तुषार सहाणे , झी टीव्ही फेम कलाकार मारुती कारंडे व इतर मान्यवर हजर होते. भूगोल फाउंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज पा. यांनी सर्वांचे स्वागत करून मंडळ पर्यावरण व वृक्षारोपण, गडकिल्ले स्वच्छता व व संवर्धन विषयी कामाची माहिती महत्व सांगितले.

Talegaon : रणांगणातील शौर्यासाठी छत्रपतींनी केला उमाबाईसाहेबांचा अनोखा गौरव

या वेळी बोलताना मान्यवरांनी पण पर्यावरण व वृक्षारोपणाचे महत्व सांगितले. तसेच सर्वांनी भूगोल (Moshi ) फाउंडेशन करत असलेल्या कामाबद्दल कौतुक करून पर्यावरणासाठी व वृक्षारोपण करण्यासाठी स्वतः सहभागी होऊन योग्य ती मदत केली जाईल असे सांगितले. तसेच  विक्रांत लांडे व तुषारभाऊ सहाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमासाठी संतनगर, इंद्रायणीनगर परीसरातील उद्योजक मारुती गायकवाड,उद्योजक नवनाथ कोलते पाटील, अनिल जगताप,राजेश किबिले,भास्कर दातीर,जयसिंग कोहीनकर , उद्योजक नेताजी पाटील अनिल घाडगे, राजेन्द्र ठाकूर,एकनाथ फटांगडे,अजय म्हस्के, संतोष पाटील, पोपट हिंगे, नागेश शेळके, श्रीकृष्ण म्हेत्रे,संकेत थोरात,अशोक चव्हाण,मच्छिंद्र बुर्डे,यादवराव जाधवरासकर, गणेश सैंदाणे, अजिंक्य पोटे, सीताराम वाळुंज इ. सहकारी हजर होते. तसेच सौ शोभा फटांगडे, सुप्रिया किबिले,विद्या मिंडे, ज्योती दरंदले , रोहिणी वाळुंज, मेघा पाटील ,सेजल वाळुंज, सागडेताई,अपुर्वा वाळुंज व इतर महिला व लहान मुलांचा सहभाग उल्लेखनीय (Moshi ) होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.