PCMC : सेवानिवृत्त कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते सन्मान

एमपीसी न्यूज – सेवनिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा कल नागरिकांना उत्तमोत्तम सेवा सुविधा पुरविण्याकडे होता, त्यांच्या उत्कृष्ठ सेवेची उणीव महापालिकेस (PCMC) सदैव राहील असे सांगून अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सेवानिवृत्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.    

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे फेब्रुवारी 2023 अखेर सेवानिवृत्त होणा-या 25 कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त  जगताप यांच्या करण्यात आला.(PCMC) या कार्यक्रमास सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे, पदाधिकारी मनोज माछरे, चारुशीला जोशी तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Bhosari News : शहरभर ई-कचरा संकलन अभियान राबवणार – आयुक्त सिंह

माहे फेब्रुवारी 2023 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये उपअभियंता सुनिल हरीदास, मुख्याध्यापिका आरेफा शेख, कनिष्ठ अभियंता प्रदीप बडदे, असिस्टंट मेट्रन व्हीक्टोरीया नाडार, लिपिक सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक अनिता जोशी, उपशिक्षिका आशा बोठे, शलाका कासार, रेखा कुमठेकर, निर्मला सातव, मजूर शंकर काटे, संभाजी लिमन, दौलत भोईर, सफाई कामगार सुरेखा म्हस्के, लक्ष्मीबाई शिंदे यांचा समावेश आहे.

तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये मुख्याध्यापिका उज्वला ढमढेरे, ए.एन.एम. जयश्री बोदूल, सफाई कामगार भागवत थोरात, राजू खरात, सफाई सेवक अशोक वाघमारे, सुर्यकांत घोंगडे, कुचराकुली आकाश कांबळे, प्रकाश गवळी, बाळकृष्ण साळवे, गटरकुली अनिल वायदंडे यांचा समावेश आहे.(PCMC) कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.