Bhosari News : शहरभर ई-कचरा संकलन अभियान राबवणार – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – शहरभर आगाऊ सूचना देऊन ई- कचरा संकलन अभियान राबविले जाणार आहे. शहरातील घातक कचरा संकलित करून त्याची (Bhosari News) रियूज रिसायकल व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-वेस्ट सेंटर भोसरी येथे आयुक्त सिंह यांच्याहस्ते ई- कचरा संकलन व्हॅनचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, ईसीएच्या विनिता दाते, डॉ. आशा राव, नताशा गांगल, हिरामण भुजबळ यांच्यासह ग्रीनस्केपचे प्रमुख रुपेश कदम उपस्थित होते.

Chinchwad News : सायन्स पार्क येथे विद्यार्थ्यांनी घेतले विज्ञानाचे धडे

महापालिका, ग्रीन स्केप आणि ई.सी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लास्टिक रिसायकलिंग कम हॅबी सेंटर च्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.(Bhosari News) या उपक्रमाची आयुक्त शेखर सिंग यांनी रूपरेषा समजावून घेत सूचना केल्या. सदर सूचनांची अंमलबजावणी करून लवकरच संपूर्ण शहरात वर्षभर कायमस्वरूपी ई- कचरा संकलन अभियान राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.