Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार का?

एमपीसी न्यूज-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे वेगवेगळ्या पक्षांकडून केले जात आहेत. अजित पवार त्यावर वारंवार खुलासा देखील करत आहेत. सोमवारीही त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा होत आहे.

IPL 2023 – हाय स्कोरिंग रोमांचक सामन्यात चेन्नईचा विजय; मॅक्सवेल ची तुफानी पारी

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत हे थोड्याच वेळात समजेल असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज  केले आहे.

अजित पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली नाही तरी मी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच आमदार मुंबईत आलो आहोत. आम्ही अजित पवार यांची भेट घेणार आहोत. ते जो निर्णय घेतील (Ajit Pawar) तो मला मान्य असल्याचे बनसोडे म्हणाले.

 

यासोबतच पुण्यातील आमदार देखील त्यांच्या सोबतच असण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.