IPL 2023 – हाय स्कोरिंग रोमांचक सामन्यात चेन्नईचा विजय; मॅक्सवेल ची तुफानी पारी

एमपीसी न्यूज – 18 एप्रिल 2023 सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये सीएसकेने (IPL 2023) आरसीबी ला 8 धावांनी हरवले. चेन्नईने स्वतःचा आयपीएल 2023 मध्ये तिसरा सामना जिंकला तर बंगळुरूने स्वतःचा या आयपीएल मधला तिसरा सामन्यामध्ये पराभव स्वीकारला. सुरुवातीच्या सामन्यांपेक्षा चेन्नईचा संघ आता अजून संतुलित दिसत आहे. चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये झालेले या सामन्यामध्ये आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला.

पहिली फलंदाजी करताना सीएसके चा स्टार सलामी वीर ऋतुराज गायकवाड (3 धावा) हा स्वस्तातच बाद झाला. परंतु त्यांच्यानंतर देवोन कोन्वे (83 धावा) आणि अजिंक्य रहाणे (37 धावा) ने चेन्नई ची पारी पुढे चालवली.  त्यानंतर आलेला चेन्नईचा फलंदाज शिवम दुबे यांनी मोठमोठे षटकार मारत फक्त 27 चेंडूंमध्ये स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. याच्यानंतर अंबाती रायडू मोहीम आली रवींद्र जडेजा आणि एम एस धोनी यांच्या थोड्या योगदानामुळे चेन्नई सुपर किंग्स हे 226 च्या विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचले. बेंगळूरू कडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, वेन पारनेल, व्यशक विजय कुमार, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हासरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.

Manobodh by Priya Shende Part 92-मनोबोध भाग 92 –  अती आदरे सर्व ही नामघोषे

बेंगलोरच्या पारीला भलेही विराट कोहली (6 धावा) आणि महिपाल लमरोर (0 धावा) यांच्या बाद होण्याच्या धक्का बसला तरीही पुढच्या फलंदाजानी चांगली कामगिरी करत सामना बराच दीर्घ क्षणापर्यंत पोहोचवला. ग्लेन मॅक्सवेल (76 धावा) आणि कर्णधार फाफ डुप्लेसीस (62 धावा)यांच्या तुफानी खेळण्याचे समर्थकांना चिंतित करून सोडले होते. एकावेळी तर वाटत होते की आरसीबी हा सामना एकतर्फा जिंकेल. परंतु त्याच्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत हा सामना 9 धावांनी जिंकला. चेन्नई कडून गोलंदाजी करताना तुषार देशपांडे ने तीन बळी घेतले तर मथिषा पाठीराणा याने दोन बळी घेतले. मोईन आली, महेश तिक्षणा आणि आकाश सिंग यांनी प्रत्येकी  एक बळी घेतला.

चेन्नईचा संघ आता भरपूर संतुलित दिसत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये सीएसके ची गोलंदाजी ही दुर्मिळ दिसत होती. परंतु युवा खेळाडू आकाश सिंग, मथिषा पाठीराणा आणि फॉर्म मध्ये आलेला तुषार देशपांडे यांच्यामुळे चेन्नईची गोलंदाजी आता सक्षम दिसत आहे. परंतु आरसीबी चे गोलंदाज आणि खालच्या क्रमातले फलंदाज हे अपयशी ठरत असून संघाचे संपूर्ण ओझे हे (IPL 2023) विराट कोहली, फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर पडून राहिले आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.