Pimpri News : अ. भा. ब्राह्मण महासंघाचे ‘ब्रह्मोद्योग ‘ यंदा दिल्ली दरबारी

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित ‘ब्रह्मोद्योग’ हे औद्योगिक प्रदर्शन 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत देशाची राजधानी दिल्ली येथे ‘हॉटेल अशोका’मध्ये होणार आहे.(Pimpri News) या ठिकाणी देशभरातून वेगवेगळ्या ब्राह्मण उद्योजकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने पिंपरीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यावेळी संघटनेच्या उद्योजक आघाडी अध्यक्ष कार्तिक गोवर्धन, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, पिंपरी चिंचवड कार्याधक्ष महेश बारसवडे, ब्रह्मोद्योग उपाध्यक्ष राजन बुडुख, सचिन बोधनी आदी उपस्थित होते.

संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे तिसरे ‘ब्रह्मोद्योग’ प्रदर्शन आहे. यापूर्वी औरंगाबाद (2016) आणि पुणे  (2019) येथे ब्रह्मोद्योगचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मोद्योगमध्ये उद्योजकांसह वकील, डॉक्टर आणि पदाधिकारी सुद्धा सहभागी होऊ शकतील.

Air India : एअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार; 250 विमाने खरेदी करण्याची घोषणा

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्य जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हा ब्रह्मोद्योगचा हेतू आहे. ब्रह्मोद्योग हा फक्त ब्राम्हण समजापुरता  मर्यादित नसून, इतर समाजातील लोकांसाठी सुद्धा खुला आहे.

ब्रह्मोद्योगामध्ये विद्यमान उद्योजकच नव्हे तर नवे उद्योजक आणि स्त्री उद्योजक देखील आहेत.(Pimpri News) त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. या वेळेच्या ब्रह्मोद्योगाला साधारण 500 उद्योजक सहभागी होतील, असा अंदाज आहे.

कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. त्याच सोबत केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे, महेंद्रनाथ पांडे, प्रल्हाद जोशी, भागवत कराड, खासदार रामचरण बोहरा, खासदार सी. पी. जोशी, खासदार घनःश्याम तिवारी हे प्रमुख पाहुणे असतील.

ब्रह्मोद्योगमध्ये सहभागी होण्यासाठी www.brahmudyog.com वर जाऊन नोंदणी करावी किंवा डॉ. गोविंद कुलकर्णी पुणे – (9623430166), सी. रमणाचार्य हैद्राबाद – (9440061010), डॉ. श्याम रघुनंदन दिल्ली (8884493273) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.