Akurdi : आकुर्डीतील बजाज सोसायटी निवडणूकीत कै. रावसाहेब शिंदे पॅनलचा विजय

एमपीसी न्यूज-  आकुर्डी येथील बजाज ऑटो एम्प्लॉईज को ऑप. क्रेडिट सोसायटीची सन 2024-2029 ची पंचवार्षिक निवडणूक (Akurdi ) चुरशीची झाली. या निवडणुकीत श्री राम पॅनलचा दारुण पराभव करून विश्वकल्याण कामगार संघटना पुरस्कृत कै. रावसाहेब शिंदे पॅनलचे 10 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले.

आकुर्डी येथील वसंतदादा पाटील शाळेत पतसंस्थेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक झाली. दरवेळी 2 महिला बिनविरोध निवडून येत होत्या परंतु यावेळी कै. रावसाहेब शिंदे पॅनेलकडून महिला उमेदवार स्नेहल खाडे या सर्वोच्च मतांनी निवडून आल्या. त्यात एकूण 87.45 टक्के म्हणजेच 1 हजार 443 मतदान झाले. तीनही वेळा झालेल्या निवडणुकीत कै. रावसाहेब शिंदे पॅनलने विजय मिळवला.

Tata Group of Company : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे टाटा उद्योग समूह

पूर्वीचे परीर्वतन पॅनल व आत्ता चे जय श्रीराम पॅनल संघटनेच्या पॅनलच्या विरोधात होते. विरोधांना धूळ चारत पॅनलचे अंकुश कोल्हापुरे, सुनील मिसाळ, पंकज पाटील, तुषार टपले, विशाल दळवी, अनिल शिंदे, रणजित वाघ, अनिल देशमुख, राहुल शिंदे, स्नेहल खाडे हे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत.

विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार, सेक्रेटरी राजेंद्र महाडिक, उपाध्यक्ष नवनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. संपूर्ण औद्योगिक आणि सहकार क्षेत्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. गेले 20  वर्षे विश्वकल्याण कामगार संघटनेचे पॅनल सभासदांसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्या ताकदीवर ही निवडणूक लढवून विजयी झालो असल्याचे पवार यांनी (Akurdi ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.