Tata Group of Company : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे टाटा उद्योग समूह

एमपीसी न्यूज – भारतातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या टाटा कंपनीचे (  Tata Group of Company ) बाजारमूल्य हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पनापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तानचे राष्ट्रीय उत्पन्न 341 अब्ज डॉलर इतके आहे. तर टाटा समूहातील कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य हे 365 अब्ज डॉलर आहे.

टाटा समूहातील 25 कंपन्या शेअर बाजारावर नोंदवल्या गेल्या आहेत. यातील टाटा केमिकल्स वगळता सर्व कंपन्यांच्या शेअरच्या भावात मागील वर्षभरात चांगली वाढ झाली आहे. टाटा कंपन्या उत्तमरीत्या कामगिरी करत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

Alandi : शिवराज प्रतिष्ठान आळंदी यांच्यावतीने आयोजीत रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद   

मागील वर्षभरातील कामगिरीमुळे टाटा समूहाचे बाजारमूल्य वाढले आहे. टाटाच्या टीसीएस कंपनीचे बाजारमूल्य सर्वाधिक 170 अब्ज डॉलर (15 लाख कोटी रुपये) आहे. मागील वर्षभरात टाटा मोटर्स या कंपनीचा शेअर देखील चांगला वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याने कंपनीचा शेअर 110 टक्क्यांनी वाढला आहे.

मागील काही वर्षांपासून पाकिस्तानवर महागाई आणि परकीय कर्जाच्या बोजा आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह इतर देशांकडे कर्ज मागितले आहे. मात्र कोणताही देश यासाठी पुढे येत (  Tata Group of Company ) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.