Alandi : शिवराज प्रतिष्ठान आळंदी यांच्यावतीने आयोजीत रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद   

एमपीसी न्यूज – काल दि.19 रोजी आळंदी मध्ये शिवजयंतीनिमित्त शिवस्मारक येथे शिवराज्य प्रतिष्ठान आळंदी देवाची ( Alandi ) यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये 124 नागरिकांनी रक्तदान केले. किरण येळवंडे यांच्याकडून प्रत्येक रक्तदात्यास डॉ.जयसिंगराव पवारांचे ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे? ‘  पुस्तक देण्यात आले.
शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत काकडे, जयसिंह कदम,श्रीराज कदम,भागवत शेजूळ,कुलदीप कदम, अरुण कुरे, बालाजी शिंदे, माऊली गलबे, शशिराजे जाधव, रमाकांत शिंदे,कुशल सुरवसे, अतुल कोतवाल, निसार सय्यद , कृष्णा कापसे, नामदेव टेकाळे, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व ज्ञानगंगा  स्कूलचे संस्थापक  विजय गुळवे  तसेच शाळेचे शिक्षक पदाधिकारी, विद्यार्थी यांच्यासह समस्त आळंदी ग्रामस्थ ,  आळंदी नगरपरिषद व आळंदी पोलिस कर्मचारी यांचे या शिबिरास सहकार्य लाभले. शिवराज्य प्रतिष्ठान आळंदी देवाची यांचे शिवजयंती साजरे करण्याचे 7 वे वर्ष आहे.
तसेच काल शिवजयंती निमित्त एक्स जिममध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन  वासुदेव लेंडघर (एक्स जिम), योगेश भाडळे (नेटवर्किंग इंजिनिअर),संजय वरपे (डी टी डी सी कुरिअर सर्व्हिस) आणि किशोर माळी (साईराज टेलर्स) यांनी केले होते.
 या शिबिरास 85 नागरिकांनी रक्तदान केले . तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आयोजकांकडून श्री भगवतगीता भेट स्वरूपात देण्यात आली. शिबिरास  वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे , पो आ मच्छींद्र शेंडे,  प्रशांत  कुऱ्हाडे,  सचिन गिलबिले, चेतन  कुऱ्हाडे व इतर मान्यवर यांनी सदिच्छा भेट दिली . एक्स जिमचे शिबीर चाकण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमास ब्लड बँकेचे डायरेक्टर डॉ. नवनाथ बरहाते  ( Alandi ) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.