Akurdi News : पीएफ कार्यालयातील आधार नोंदणी शिबिराचा 100 नागरिकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयात अंशदात्यांसाठी आधार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंशदात्यांच्या आधार कार्डमध्ये सुधारणा व इतर माहिती अद्ययावत करण्यात आली. शंभरहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त-।  के. रविंद्र कुमार व भविष्य निधी आयुक्त-।। अनुक्रमे आशुतोष,  मितेश राजमाने, सचिन बोराटे व बिजयंत कुमार यांच्या हस्ते झाले.

शिबिरासाठी भारतीय डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी के. एस. पारखी यांचे सहकार्य लाभले. भविष्य निधीशी निगडित अंशदात्यांना आधार कार्डमध्ये चुका किंवा फेरफार असल्यामुळे त्यांची केवायसी अद्ययावत करून खात्यातून अंशदान काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे पीएफ कार्यालयाने शिबिराचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.