Akurdi News : सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत आढळला कुजलेला मृतदेह

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सकाळी आकुर्डी येथील वेदांत रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत रेसिडेन्सी मधील रहिवाशांना पाण्याचा वास येऊ लागल्याने त्यांनी सोसायटीच्या वरील पाण्याच्या टाकीत पाहिले. त्यावेळी नागरिकांना पाण्याच्या टाकीत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.

याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सोसायटीमध्ये दोन दिवसांपूर्वी एक वेडसर व्यक्ती त्याच्या आईला शोधत आला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.