Akurdi potholes : आकुर्डीत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघात

एमपीसी न्यूज :  आकुर्डीत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघात होत आहेत. येथील गणेश व्हीजन समोरील रोडवर कमी डांबर वापरून खड्डे बुजवण्यात आले होते.(Akurdi potholes) आता मात्र ही खडी निघून रस्त्यावर पसरल्याने अपघात होत आहेत.

आकुर्डी ते दळवीनगर रेल्वे उड्डाणपुल पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. काही खड्डे खूप विस्तीर्ण आहेत. त्यामधील खडी रस्त्यावर पसरली आहे. या खडीवरून जाताना दु चाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. अंदाजे आठवड्याभरापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने येथील खड्डे बुजवले होते. परंतु कमी डांबर वापरल्याने खडी निघून रस्त्यावर पसरलेली दिसत आहे. यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत.असे मत वाहचालक हरीश वर्मा यांनी व्यक्त केले आहे.

PCMC News: शहरातील अनाधिकृत होर्डींग्ज काढणार; दोन संस्थांची नेमणूक

संदीप चव्हाण म्हणाले की, “या रस्तावरील खड्ड्यातून जाताना अक्षरक्षा हाडे खिळखिळी होत आहेत. महानगरपालिकेने जास्त डांबर वापरून खड्डे बुजवले पाहिजे जेणेकरून परत खड्डे होणार नाहीत.”

याबाबत शिरीष पोरेडी, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड मनपा म्हणाले की, “पावसाळ्यामुळे या रस्त्यावर खड्डे झाले होते.(Akurdi potholes) लोकांचा त्रास कमी होण्यासाठी लवकर खड्डे दुरुस्त करण्यात आले. पाऊस असल्यामुळे खड्डे दुरुस्त करताना आतील भाग काढुन व्यवस्थित खड्डे बुजवले नव्हते. आता आम्ही व्यवस्थित खड्ड्यांमधील आतील भाग खोदून त्यावर डांबरीकरण करणार आहोत.”

पोरेडी पुढे म्हणाले की, “तसेच या रस्त्यावर बऱ्याच  ठिकाणी उंचवटे  निर्माण झाले आहेत ते आम्ही काढून लेवलींग करणार आहोत. त्यामुळे वाहन चालकांना तेथून जाताना हदरे बसणार नाहीत. हे सर्व काम महिन्या अखेर पर्यंत पुर्ण करू.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.