PCMC News: शहरातील अनाधिकृत होर्डींग्ज काढणार; दोन संस्थांची नेमणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील (PCMC News) अनाधिकृत होर्डींग्ज जाहिरात फलकासह काढण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्था होर्डींगचे साहित्य भंगारात विक्री करणार असून त्यातील 99 टक्के हिस्सा पालिकेला देणार आहेत. तीन वर्षासाठी हे काम दिले आहे.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या आकाराचे अनधिकृत जाहिरात होर्डींग्ज फलक स्ट्रक्चरसह स्व:खर्चाने काढून टाकणे, निघालेल्या स्क्रॅपचे एकूण वजनानुसार मंजूर दराने येणा-या किंमतीमधून किती रक्कम पालिकेला देणार याकरिता एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी 4 निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी अरबाज इंजिनिअरिंग अँन्ड सिव्हील कन्स्ट्रक्शन यांनी निविदा अंदाजपत्रकीय दरावर 99 टक्केवारी दर दिला आहे.

उर्वरित 3 निविदाधारकांपैकी गणेश एंटरप्रायजेस यांनीही (PCMC News) तेवढ्याच दरानुसार काम करण्याची तयारी दर्शविली आहे. तर, इतर दोन निविदाधारकांनी काम करण्यास नकार दिला. हे दोन्ही निविदाधारक काम पूर्ण करण्यास सक्षम आहेत. त्यांचे दर स्वीकृत करण्यास आणि करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. कामाचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे.

याबाबत आकाशचिन्ह परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले म्हणाले, महापालिकेने शहरातील अनाधिकृत होर्डींग्ज (PCMC News) काढण्यासाठी अरबाज इंजिनिअरिंग अँन्ड सिव्हील कन्स्ट्रक्शन आणि गणेश एंटरप्रायजेस यांची नेमणूक केली. होर्डींग काढणारी यंत्रणा त्यांचीच राहणार आहे.

डिजीटल बोर्ड काढले जाणार आहेत. पालिकेने सांगितलेले अनाधिकृत होर्डींग काढणे, ते भंगारात विक्री करुन त्यापैकी 99 टक्के रक्कम या संस्था महापालिकेला देणार आहेत.  पुढील तीन वर्षात शहरात जेवढे अनाधिकृत होर्डींगज उभे राहतील. ते या संस्थांनी काढून भंगारमध्ये विक्री करायचे आणि त्यातून मिळणार रक्कमेपैकी 99 टक्के रक्कम महापालिकेला द्यायची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.