Akurdi : मोठ्यांच्या सहवासातून मोठेपण लाभते – राज अहेरराव

एमपीसी न्यूज – मोठ्यांच्या सहवासातून मोठेपण मिळते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.आकुर्डीतील बीना इंग्लिश मिडियम स्कूल येथे पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त नियोजित ‘साहित्ययात्री’ या साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिकृत बैठकीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राज अहेरराव बोलत होते.

विविध विषयांवर, वेगवेगळ्या आकृतिबंधांत सुमारे चाळीसहून अधिक पुस्तकांचे लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्या पंचाहत्तरीचे औचित्य साधून शहरातील साहित्यिकांनी एकत्र येऊन ‘साहित्ययात्री’ हे सर्वार्थाने आगळेवेगळे साहित्य संमेलन संपन्न व्हावे, असा मनोदय व्यक्त केला.

  • यावेळी राज अहेरराव म्हणाले की, “ज्याप्रमाणे चंदनाच्या स्पर्शाने आपण सुगंधित होतो. त्याप्रमाणे विचारवंतांच्या सहवासातून मनात विचार रुजायला सुरुवात होते. त्या अर्थाने मोठ्यांच्या सहवासातून मोठेपण मिळते.”

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी, “संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक एकत्र आले की विचारांचे आदानप्रदान होते म्हणून शहरातील सर्व साहित्यिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे मत व्यक्त केले.

  • प्रा. तुकाराम पाटील यांनी आपल्या मनोगतातून, “मी आयुष्यभर साहित्यसेवा केली, त्याचेच फळ म्हणून माझ्या अमृतमहोत्सवानिमित्त परिसरातील साहित्यिक ‘साहित्ययात्री’ संमेलनाचे आयोजन करीत आहेत म्हणून याविषयी मी कृतज्ञ आहे.” अशा भावना व्यक्त करून या निमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेत आवर्जून लेखन करावे, असे आवाहनही केले.

यावेळी साहित्ययात्री संमेलनाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :-
अध्यक्ष :-राज अहेरराव, उपाध्यक्ष :-सुरेश कंक, राजेंद्र घावटे,
कोषाध्यक्ष :-डॉ. श्रीश पाटील, सदस्य :-डॉ. सीमा पाटील, डॉ. अनुराधा मराठे,
गौरवग्रंथ समिती :प्रमुख संपादक :-डॉ. बाबूराव उपाध्ये, डॉ. चंद्रकांत पोतदार.
संपादक मंडळ :– प्रदीप गांधलीकर, नीलेश म्हसाये, नंदकुमार मुरडे, नितीन हिरवे, मंगला पाटील, रजनी अहेरराव.
मधुश्री ओव्हाळ, दिनेश भोसले, आय.के.शेख, बाळासाहेब घस्ते, चिंतामण कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, माधुरी विधाटे, शरद काणेकर, रमेश वाकनीस, अश्विनी कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

  • सविता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. तुकाराम पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.