BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : ….अन्‌ राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे शिवज्योत घेऊन धावले अनवाणी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – शिवप्रेमी तरुणांची शिवज्योत घेऊन चाललेली रॅली दिसताच प्रचारासाठी जाणारे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे क्षणाचाही विलंब न करता रॅलीत सहभागी झाले. सहभागीच नाही तर हातामध्ये शिवज्योत घेऊन डॉ. कोल्हे तरुणांसोबत अनवाणी धावले. यावेळी शिवप्रेमींनी एकच जल्लोष करत जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा दिल्या.

टीव्हीमालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मध्ये मुख्य भूमिका साकारत असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. मालिका विश्वासह त्यांनी राजकारणात देखील उडी घेतली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरु आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. पुणे-आळंदी मार्गावरून डॉ. कोल्हे प्रचारासाठी जात असताना शिवप्रेमी तरुणांची शिवज्योत घेऊन चाललेली रॅली दिली. क्षणाचाही विलंब न करता डॉ. कोल्हे रॅलीत सहभागी झाले.

या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांनी शिकवलेला अभिमान आणि स्वबळावरचा विश्वास यावर आधुनिक महाराष्ट्र आजही उभा आहे. माझ्या वतीने मी ज्यांचे विचार, कर्तृत्व आणि मूल्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन करतो, असे डॉ. कोल्हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

.

HB_POST_END_FTR-A1
.