Alandi : प्रक्षाळपूजे निमित्त श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये गर्दी

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये सकाळी प्रक्षाळपूजेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होती. यावेळी स्वामींच्या समाधीवर अनेक भाविकांनी लिंबू, पिठीसाखर मिश्रित पाण्याचा जलाभिषेक करून स्वामींच्या समाधीचे स्पर्श दर्शनही घेतले.

Pune : एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड बैठक

तसेच काहीं भाविकांनी स्वामींच्या समाधीवर विधीवत पूजा, दुग्ध अभिषेक केले. मठामध्ये स्वामींची सुंदर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती. सुंदर आकर्षक अशी ती रांगोळी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. मठाबाहेर प्रक्षाळ पूजेनिमित्त तात्पुरत्या स्वरूपात हार प्रसादाचे दुकान थाटले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.