Alandi : इंद्रायणी माता परिक्रमा पालखीचे देहूतून वडगांवकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज –   दि.2 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र कुरवंडे इंद्रायणी (Alandi) उगमस्थळ या ठिकाणी पूजा करुन इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्याची ह भ प गजानन महाराज लाहुडकर व उपस्थित मान्यवरांच्या वतीने घोषणा करण्यात आली होती. दि.11 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत इंद्रायणी नाम जप, पूजा, सायंकाळी इंद्रायणी महाआरती व पालखी रथाची मिरवणुक हे कार्यक्रम संपन्न झाले.
दि .17 रोजी काल सकाळी 7 वा. इंद्रायणी माता कलश पुजन श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पार पडले. तद्नंतर तो कलश नदी घाटावर आणण्यात आला. इंद्रायणी मातेची आरती जलपूजन करून करून तो कलश पालखीत ठेवण्यात आला व टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात इंद्रायणी माता परिक्रमेची सुरुवात करण्यात आली.
विश्र्वशांती केंद्र इंद्रायणी तीरावर समस्त ग्रामस्थ आळंदी , वारकरी यांच्या शुभहस्ते या पालखी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पा., डी डी. भोसले पा. , सुरेश काका वडगांवकर, आनंदराव मुंगसे, गणपतराव कुऱ्हाडे , शिरीष कारेकर , अरुण घुंडरे, विचारसागर लाहुडकर महाराज व इतर मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यातून इंद्रायणी नदीच्या दुतर्फा ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून इंद्रायणी जलप्रदूषण मुक्ती पर प्रबोधन करण्यात येणार आहे.

काल सकाळी 11 वाजता मोशी येथे  राजुभाऊ बोराटे यांच्यावतीने पालखी सोहळ्यातील भाविकांचे स्वागत करून  अल्पोपहाराची करण्यात आली.
काल दुपारी  रोहिदास अण्णा मोरे टाळगाव प्रासादिक दिंडी क्र 38 ( श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा) यांच्या वतीने सर्व भाविकांना दुपारचा महाप्रसाद देण्यात आला. टाळमंदिर येथे ह भ प परमेश्वर महाराज गव्हाणे यांची प्रवचन सेवा झाली. सायंकाळी ठीक पाच वाजता श्री क्षेत्र देहु येथे पालखी सोहळा पोहोचला. त्यानंतर इंद्रायणी मातेची आरती करण्यात आली.
 देहूत ह भ प वसंत महाराज भालेराव यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.व श्रीमती सिंधुबाई पांडुरंग बोराटे यांचे स्मरणार्थ बोराटे  परिवारातर्फे सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.देहू संस्थांनच्या वतीने सर्व भाविकांची वैकुंठमंदिर भक्त निवास येथे मुक्कामाची सोय करण्यात आली होती. आज सकाळी देहूतून या सोहळ्याने वडगांव कडे प्रस्थान केले आहे.आज दि.18 रोजी रात्री वडगांव येथे (Alandi) मुक्काम असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.