Alandi : शेतीच्या वाटपाच्या कारणावरून आई-वडील आणि मुलांमध्ये वाद;परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – शेत जमिनीचे वाटप करण्याच्या(Alandi) कारणावरून आई-वडील आणि मुले व सुना यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी वडील आणि मुलांनी एकमेकांच्या परस्पर विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी खेड तालुक्यातील कोयाळी गावात घडली.

भगवान यशवंत कोळेकर (वय ५९, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा अमोल भगवान कोळेकर, राहुल भगवान कोळेकर, दोन सुना आणि अन्य एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कोळेकर आणि त्यांची पत्नी त्यांच्या घरी असताना (Alandi)आरोपी दोन्ही मुले आणि त्यांच्या बायका तिथे आल्या. शेती वाटपाच्या कारणावरून दोन मुलांनी फिर्यादी आणि त्यांच्या तिसऱ्या मुलाला व त्याच्या पत्नीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलगा राहुल याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Hinjawadi : जमिनीची मोजणी करण्यास प्रतिकार केल्याने जीवे मारण्याची धमकी

याच्या परस्पर विरोधात मुलगा राहुल भगवान कोळेकर (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वडील भगवान यशवंत कोळेकर, भाऊ दिवाण भगवान कोळेकर (वय ३५), आई कालन भगवान कोळेकर (वय ५५), तुकाराम यशवंत टेंगले (वय ४८, रा. कोयाळी) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे घरी असताना फिर्यादी यांचा भाऊ, भावाची पत्नी, भावाची मुलगी यांना शेतीच्या वाटपाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. वडील आणि भाऊ दिवाण यांनी दगडाने व काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.