Alandi : अखेर दमयंती कुऱ्हाडे निवासस्थान परिसरात पाणीपुरवठा सुरू

एमपीसी न्यूज : आळंदी येथील पद्मावती रस्त्यावरील दमयंती कुऱ्हाडे निवास परिसरात पालिके मार्फत अनेक दिवस पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे त्या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पालिकेत वारंवार पाठपुरावा दमयंती कुऱ्हाडे यांनी केला होता.

त्याला 28 दिवसाने यश मिळाले आहे. त्यांच्या मागणीला नगरपालिकेचे व पीडब्लूडीचे सहकार्य लाभले असून 28 एप्रिल रोजी पीडब्लूडी द्वारे तेथील पाईप लाइन खोदण्यात आली .व तिथे पाणीपुरवठा कशामुळे होत नाही? हा शोध घेत तेथील समस्या सोडवण्याचे काम त्यांनी केले.

येथील नागरिकांना अनेक दिवस पाण्याची समस्या असल्याची माहिती आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांना कळाली होती. तत्काळ त्यांनी त्या भागात लक्ष दिले. संबधीत दोन्ही कर्मचारी वर्गाला समस्या सोडवण्यासाठी सांगितले होते.
या भागातील पाण्याची समस्या सुटल्याने स्थानिक नागरिकांनी आमदार दिलीप आण्णा मोहिते, पी डब्लू डी व पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच तेथील समस्येबाबत 27 एप्रिल रोजी एमपीसी न्यूजद्वारे वृत्त प्रसारित करण्यात आले होते.

Pimpri : मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात मानवी हक्क आयोगात दावा दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.