Pimpri : मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवाविरोधात मानवी हक्क आयोगात दावा दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव (Pimpri) रोखण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याने शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद यांनी थेट  राज्य मानवी हक्क आयोगात दावा दाखल आहे.

ह्युमन राइट असोशिएशन फॉर प्रोटेक्शनचे अध्यक्ष एम. डी. चौधरी यांच्या मार्फत काशिद यांनी हा दावा दाखल केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 2022- 23 या एका वर्षात तब्बल 10350 नागरिकांना मोकाट श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोकाट श्वानांची दहशत निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासन मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी  श्वानांची नसबंदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असतानाही शहरात मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  अशा श्वानांकडून लहान मुले,  महिला, ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनाही वाढत आहेत.

मोकाट श्वानांचा उपद्रव रोखण्याची मागणी करुन देखील प्रशासन (Pimpri) कोणत्याही ठोस उपाययोजना राबवित नसल्याने शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशिद यांनी ह्युमन राइट असोशिएशन फॉर प्रोटेक्शनचे अध्यक्ष एम. डी. चौधरी यांच्या मार्फत राज्य मानवी हक्क आयोगात दावा दाखल आहे.

Maharashtra : 1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.