Alandi : हरवलेल्या मोबाईल मधून बँकेची माहिती घेत 88 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – हरवलेल्या मोबाईल मधून बँकेची गोपनीय (Alandi) माहिती घेत अज्ञाताने एका व्यक्तीच्या बँक खात्यातून 88 हजार 570 रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 20 ते 26 डिसेंबर या कालावधीत आळंदी येथे घडली.

कृष्णा शत्रुघ्न भारद्वाज (वय 50, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारद्वाज यांचा मोबाईल फोन हरवला होता. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईल मध्ये असलेल्या बँकेची माहितीवरून बँक खात्यातून ऑनलाईन माध्यमातून 88 हजार 570 रुपये ट्रान्सफर (Alandi) करुन घेतले. हा प्रकार निदर्शनास येताच भारद्वाज यांनी सायबर पोर्टलवर तक्रार केली. त्यानंतर ट्रान्सफर केलेल्या रकमेपैकी 18 हजार 700 रुपये होल्ड करण्यात आले आहेत. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.