Hinjawadi : महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाठलाग करून महिलेशी (Hinjawadi) गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुन 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडला.

Pune : सोनं चोरून चोरट्यांनी पुरले शेतात; पुणे पोलिसांनी मेटल डिटेक्टरने काढले शोधून, आरोपी अटकेत

याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून यावरून सुभाष देवकर (वय 40 रा. बावधन) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कामावरून घरी जात असताना आरोपीने फिर्यादिशी गैरवर्तन केले. तसेच हात पकडून शारिरीक संबंधाची मागणी केली. यावरून आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.