Alandi news : महाद्वार चौकातील नो पार्किंगमध्ये असणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे नागरिकांच्या रहदारीस मोठा अडथळा, नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरा जवळील महाद्वार चौकात नो पार्किंगच्या जागेत व नो पार्किंग फलकाच्या येथेच मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने (Alandi news) लागल्याने दर्शनासाठी मंदिरात पायी चालत येणाऱ्या भाविकांसह इतर रहदारी करणाऱ्या वाहनांना सुध्दा मोठा अडथळा या दुचाकी वाहनांमुळे निर्माण होत आहे.तसेच येथे लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे येथील रस्ता अरुंद झाला आहे.

सोमवारी सकाळी महाद्वार चौकातील कॉर्नरवर आळंदीतील एका स्थानिक व्यक्तीच्या पायावरून वाहन गेल्याची घटना येथे घडली.सुदैवाने त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली नाही.(Alandi news) तसेच येथे लावण्यात येणाऱ्या दुतर्फा दुचाकी वाहनांमुळे येथील रस्ता अरुंद झाल्याने येथे रहदारी करणाऱ्या काही दुचाकी,चारचाकी वाहनांच्या धक्क्याने पायी चालत असणारी लहान मुले, ज्येष्ठ, वृद्ध नागरिक पडल्याच्या घटना या परिसरात वारंवार घडत असल्याचे दिसून येतात.त्यामुळे वाहन चालक व पादचारी इ. व्यक्तींची वाहनांमुळे या परिसरात वाद विवादाच्या मोठ्या घटना घडत असतात.

जुन्या प्रथा परंपरेनुसार मृत व्यक्तीची अंत्ययात्रा जाते वेळी माऊली मंदिराच्या महाद्वारा समोर काही वेळ थांबून पुढे जात असते.त्यावेळी सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने दिसून येतात. (Alandi news) त्यामुळे अंत्ययात्रेला सुद्धा या वाहनांचा मोठा अडथळा येथे निर्माण होत असतो.वाहने आत येऊ नये म्हणून पालिका प्रशासना तर्फे लावण्यात आलेले गेट सुद्धा सर्रास उघडे ठेवण्यात आले आहे.

Pimpri Corona Update : कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू

चावडी चौकातील  गेट उघडे ठेवत त्या गेट मध्ये व गेट समोरील,आतील, बाहेरील रस्त्यावरच चारचाकी वाहने लावण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.गेट खुले असल्याने  मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी ,तीनचाकी,चारचाकी वाहनांची रहदारी होत असते.या मंदिर परिसरात नो पार्किंग च्या जागेतच मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे झालेल्या अरुंद रस्त्यामुळे येथून रहदारी करण्याऱ्या वाहनां मुळे एखादी मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण?अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

वाहतूक पोलीस वेळोवेळी येथील या वाहनांवर दंडात्मक कारवाई करताना दिसून येतात.परंतु येथील नो पार्किंग च्या जागेत वाहने कायमस्वरूपी लागू नये. यासाठी वाहतूक पोलीस प्रसाशन व नगरपालिका प्रसाशन एकत्र येऊन संयुक्त बैठक घेऊन या परिसरात त्याबाबत महत्त्वपूर्ण कायमस्वरूपी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.