Old Sangavi MNS : स्पर्धा परिक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरणारे अडगळीचे सामान त्वरित काढून टाकण्याची मनसेची मागणी

एमपीसी न्यूज : जुनी सांगवी (Old Sangavi MNS) येथील शहीद अशोक मारूतीराव कामठे स्पर्धा परिक्षा केंद्र येथील जुने फर्निचर, जुन्या खुर्च्या, अडगळीचे अडथळे त्वरित काढून टाकावी, अशी मागणी मनसेने केली आहे. पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू दत्तू सावळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘ह’ प्रभाग अधिकारी विजयकुमार थोरात यांना आज निवेदन देऊन ही मागणी केली आहे. तसेच, याबाबत त्यांनी चर्चा देखील केली आहे.

साळवे यांनी निवेदनात म्हंटले आहे, कि ”शहिद अशोक मारूतीराव कामठे स्पर्धा परिक्षा केंद्र विद्यार्थ्यांचे असून त्यांना अडचण निर्माण होत आहे. यवतील अभ्यासिकामधील पेंन्टीग, काही फर्निचर, सर्व खुर्च्या बदलण्यात आल्या आहेत. परंतु, जुने सर्व फर्निचर, खुर्च्या तशाच अस्थाव्यस्थ पडल्या असल्याने खूप अडथळा निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी साफसफाई देखील होत नाही. धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Pimpri Corona Update : कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू

विद्यार्थ्यांना अडचणीत, अस्वच्छतेत बसावे (Old Sangavi MNS) लागते. त्यांना अभ्यास करण्यास स्वच्छ व प्रसन्न वातावरण असावे. येथील लाईटचे बोर्ड हलतात, तर कधी निघतात, फॅनचे आवाज येतात व अस्वच्छ आहेत. काही वर्षांपूर्वी इंटरनेट बसविलेले आहे, पण ते अद्याप कधीही चालूच केलेले नाही, वोचमॅन कधीही जागेवर नसतात अशा अनेक समस्या आहेत.

आपण या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन सर्व पाहणी तसेच चौकशी करून लवकरात लवकर आदेश देऊन योग्य अशी चोख व्यवस्था आपल्या माध्यमातून सात दिवसात करून घ्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लवकरच आंदोलन करण्यात येईल. असे त्यांनी मागणीत म्हंटले आहे. यावर लवकरच कारवाई करून सर्व काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन थोरात यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.