Pimpri Corona Update : कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दीड महिन्यानंतर (Pimpri Corona Update) पिंपरी-चिंचवड शहरात  कोरोनामुळे एका 74 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर, शहराच्या विविध भागातील 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. कोरोनामुक्त झालेल्या 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

पिंपरी, संत तुकारामनगर येथील 74 वर्षीय रुग्णावर महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 72 हजार 310 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 104 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 102 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

PCMC News: देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प

तर, 2 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल (Pimpri Corona Update) आहेत. आज दिवसभरात 21 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 85 हजार 443 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.