रविवार, जानेवारी 29, 2023

Pimpri Corona Update : शहरात आज 24 नवीन रुग्णांची नोंद; 7 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 24 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, (Pimpri Corona Update) कोरोनामुक्त झालेल्या 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. (Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 72 हजार 568 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 94 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 91  रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Pune murder : येरवडा येथील दुहेरी खूनातील आरोपी गजाआड

तर, महापालिका  रुग्णालयामध्ये 4 रुग्ण दाखल आहेत.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 77 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 87 हजार 997 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

Latest news
Related news