Alandi News : आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून कामकाज, संपास दिला पाठींबा

एमपीसी न्यूज : आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून पालिका कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवले. आज दि. 14 मार्च पासून जुन्या पेंन्शनसाठी सरकारी,(Alandi News) निमसरकारी,कर्मचारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी इ. करत असलेल्या संपास पाठींबा दर्शवला आहे.

Pune News : पुण्याची चिंता वाढली; शहरात H3N2 चे 22 रुग्ण आढळले

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी हीच आळंदी नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मागणी आहे. त्यामुळे राज्यभर या मागणीसाठी सुरू असलेल्या संपास आळंदी नगरपरिषद कर्मचारी, (Alandi News) अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे.परंतु अत्यावश्यक सेवेवर परिणाम होवू नये आणि नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी नगरपरिषदेचे कामकाज नेहमी प्रमाणे सुरू राहील.असे यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.