Wrestling : सांगलीत रंगणार महिलांच्या कुस्तीचा थरार ! महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तारखा जाहीर

एमपीसी न्यूज : पुण्यात पार पडलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पाश्वभूमीवर आता महाराष्ट्रात ‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा रंगणार आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या वाहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकावण्याची राज्यातील महिला कुस्तीपटू जय्यत तयारी करीत आहेत. (Wrestling) अशातच या स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पुण्यातील बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला.

Alandi News : आळंदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून कामकाज, संपास दिला पाठींबा

 

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्यात रंगणार असून 23 आणि 24  मार्च रोजी याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरीच (Wrestling) आयोजन करण्यात आलं आहे. महिला केसरी कुस्ती स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी ही माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.