Pune News : पुण्याची चिंता वाढली; शहरात H3N2 चे 22 रुग्ण आढळले

एमपीसी न्यूज : पुण्यात H3N2 या विषाणूमुळे  बाधा झालेले 22 रुग्ण आढळले आहेत. या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याची लक्षण ही सर्वसामान्य फ्लू सारखीच दिसून येत आहेत. तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. जानेवारी ते मार्च या दरम्यान पुणेकरांना बाधा झाली आहे. (Pune News) त्यामुळे आता पुण्यात पुन्हा मास्क लावून फिरायची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातले आहेत याबाबत एनआयव्हीने तसा अहवाल दिला आहे.

पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. H3N2 संदर्भात आता खासगी रूग्णालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.  H3N2 हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदललेला प्रकार आहे. मात्र या आजाराची लक्षणं ही सामांन्य फल्यू सारखीच असून जीवाला धोकादायक नसल्याची बाब दिलासादायक आहे. व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

Pune News : शाम देशपांडे यांचा भाजप मध्ये प्रवेश

H3N2 व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने H3N2 व्हायरस संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. राज्यांचा सूचना करण्यात आल्या आहेत. (Pune News) या बैठकीत आरोग्यमंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातही याचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.