Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजरा

एमपीसी न्यूज – आळंदी येथे भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (Alandi)यांच्या जयंतीनिमित्त श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. मैत्री करू या गणिताशी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.

या दिवशी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित विषयातील अवघड संकल्पनांवर आधारित अशा विविध रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटल्या. यामध्ये गणितातील विविध सूत्रे, भौमितिक आकार यांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर अतिशय अवघड वाटणारा गणित विषय देखील मनोरंजक पद्धतीने विविध कविता, कोडी तसेच गणित गीते यांच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडण्यात आला.

Pune : शारदाबाई पवार महाविद्‌यालयात 11 व 12 जानेवारी रोजी राज्यस्तरीय करिअर संसदेचे आयोजन

संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन इयत्ता नववी च्या विद्यार्थिनीं भक्ती राऊत, सायली पराये, गायत्री जाधव (Alandi)यांनी केले. रांगोळीने प्रदर्शनामध्ये विविध रंग भरण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे तसेच पर्यवेक्षिका अनिता गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख अनुजायिनी राजहंस यांनी केले. दीपक मुंगसे यांनी ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा संदर्भ देत गणित विषयाचे महत्त्व सांगितले.

या दिवशी झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विद्यालयामध्ये पुणे टॅलेंट सर्च एक्झामिनेशन 2023 या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेला इयत्ता दहावीचे एकूण 250 विद्यार्थी बसले होते.

संपूर्ण कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील शशिकला वाघमारे, लीना नेमाडे, अमीर शेख, संजय उदमले, संजय कंठाळे, कल्पना घोलप, अनुराधा खेसे, पूजा चौधरी, उज्वला कडलासकर, आरती वडगणे, संदीप वालकोळी, शिवाजी जाधव, गोविंद निळे आदींचे सहकार्य लाभले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.