Kharadi : महापारेषणचे खराडी उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद; मात्र नगर रोड वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

एमपीसी न्यूज – महापारेषण कंपनीचे खराडी 132 केव्ही अतिउच्चदाब (Kharadi) उपकेंद्र अत्यावश्यक पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. 23) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, या कालावधीत पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने नगर रोड परिसरातील वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

महापारेषणच्या खराडी 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या 22 केव्हीच्या पाच वीजवाहिन्यांद्वारे खुळेवाडी, विमाननगर परिसर, सोपाननगर, कोलते पाटील फेज 1 ते 4, येरवडा, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर, संजय पार्क, आळंदी रस्ता, संभाजीनगर, न्याती, लोहगाव, वडगाव शिंदे, वडगाव गावठाण, पाटीलमळा, खांदवेनगर, खराडी बायपास, वडगाव शेरी परिसर, धानोरी परिसर, श्री पार्क सोसायटी, श्रीराम सोसायटी, खुळेवाडी गाव, गिगा स्पेस बिल्डिंग आदी परिसराला वीजपुरवठा केला जातो. पण, महापारेषणच्या उपकेंद्रातील काही यंत्रणेची दुरुस्ती सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिशय आवश्यक झाली आहे.

Pune : शारदाबाई पवार महाविद्‌यालयात 11 व 12 जानेवारी रोजी राज्यस्तरीय करिअर संसदेचे आयोजन

त्यामुळे शनिवारी (दि. 23) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत महावितरण व महापारेषणकडून 34 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून पर्यायी स्वरुपात सर्व पाचही वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात (Kharadi) येणार आहे.

महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक नियोजन पूर्ण झाले आहे. मात्र ऐनवेळी पाचपैकी एखाद्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित वाहिनीवरील भागात वीज खंडित होऊ शकते. त्यासंबंधीची माहिती संबंधित वीजग्राहकांना एसएमएसद्वारे ताबडतोब दिली जाणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.