Alandi News :आळंदीत मद्यपींमुळे नागरिकांना त्रास

एमपीसी न्यूज- आळंदी येथील हजेरी मारुती (Alandi News) मंदिर चौकातील रस्त्यावरच  एका मद्यपीने मद्यधुंद अवस्थेत त्याच्या पिशवीतले स्वतःचे कपडे व इतर कपडे रस्त्यावरच टाकून दिले.तो त्याचे कपडे तेथील इमारतीच्या नजदीकच्या ठिकाणा वरून आणून रस्त्या मध्ये बराच वेळ उभे राहून ते टाकत असल्याचे चित्र दिसून आले.त्यामुळे  तेथील रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना  वाहन चालवताना त्याचा अडसर ठरत होता.काही वेळाने त्याने परत पिशवीत ती  कपडे भरत तिथून निघून गेला.

Pune : पुण्यात कोट्यावधी रुपयांचा ऑनलाईन एज्युकेशन घोटाळा

आळंदी येथील विशेषतः इंद्रायणी नदीपलीकडील (हवेली) घाटावर (वैतागेश्वर मंदिरा लगत असणाऱ्या)अनेक मद्यपीं मुळे घाटावरती येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या पासून त्रास होत असतो.घाटावरती मद्यपीना आसरा भेटू नये,यासाठी प्रशासनाने तिथे योग्य ती उपाय योजना करणे आवश्यक आहे.तसेच आळंदी शहरातील काही फुटपाथवर सुद्धा मद्यपी मद्यधुंद अवस्थेत (Alandi News) पडलेले दिसून येतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.