Alandi News : आळंदी मध्ये वै. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या दहाव्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज- आळंदी येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदीरामध्ये साधकह्दय वै. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांचा दहावा पुण्यस्मरण सोहळा(Alandi News) आयोजित केला आहे.या सोहळ्या मध्ये अखंड हरिनाम सप्ताह,दिव्य ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sangavi News : सांगवी मधील समतानगर परिसरातील बंद पथदिवे दुरुस्त

या सोहळ्याचा प्रारंभ 15 जानेवारी रोजी झाला असून या सोहळ्याची सांगता 22 जानेवारी रोजी शांतिब्रम्ह मारोती कुऱ्हेकर यांच्या सकाळी 9 ते 11च्या  काल्याच्या किर्तनाने होणार आहे.15 जानेवारी  ते 21 जानेवारी रोजी रोज संध्याकाळी साडे सहा ते साडे आठ या वेळेत कीर्तन सेवांचे आयोजन करण्यात आले आहे.या पुण्यस्मरण सोहळ्यात दि.15 रोजी ह भ प विठ्ठल महाराज कापसे व दि.16 रोजी ह भ प विष्णू महाराज केंद्रे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.दि.17 रोजी महंत प्रमोद महाराज  जगताप, दि.18 रोजी ह भ प भास्कर महाराज पवार,दि.19 रोजी आसाराम महाराज बडे,दि.20 रोजी ह भ प प्रवीण महाराज गोसावी,दि.21 रोजी ह भ प अशोक महाराज जाधव यांची कीर्तन सेवा संपन्न (Alandi News)होणार आहे.याबाबतची माहिती ह भ प विष्णू महाराज केंद्रे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.