Sangavi News : सांगवी मधील सगंमनगर परिसरातील बंद पथदिवे दुरुस्त

एमपीसी न्यूज : जुनी सांगवी मधील संगमनगर येथील पथदिवे बंद असल्याने स्थानिक नागरिकांना व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. (Sangavi News) याबाबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभाागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार बंद पथदिवे दुरुस्त करून चालु करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष  राजू सावळे यांनी सांगितले की, “संगमनगर येथील रस्त्यांवरील 15 ते 17 पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनचालकांना देखील या रस्त्यांवरून जाताना त्रास सहन करावा लागला. याबाबत स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली. त्यानंतर मी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटून याबाबत तक्रार दाखल केली व याविषयावर चर्चा केली.”

Pune Crime News :मार्केट यार्डमधील व्यावसायीकाला लुटणाऱ्या गुप्ता टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

याबाबत विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पथदिवे दुरुस्त करण्याचे आश्वसन दिले. त्याप्रमाणे त्यांनी 12 ते 13 प पथदिव्यांची दुरुस्ती करून ते चालू केले आहेत. अजून 4 ते 5 पथदिव्यांची दुरुस्ती बाकी आहे.”

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र अहिरे म्हणाले की, केबल जळाल्यामुळे तेथील 10 ते 15 पथदिवे शनिवार व रविवारी बंद होते. त्यादिवशी कार्यालयीन सुट्टी होती. काल 10 ते 12 पथदिवे सुरू करण्यात आले होते. आज उर्वरित 2- 3 पथदिवे सुरू करण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.