Alandi News : आळंदी-देहू रस्त्यावर पाण्याच्या पाइपलाइनच्या व्हाॅल्व्हमधून गळती

एमपीसी न्यूज – आळंदी पालिका (हवेली )हद्दीतील (Alandi News) आळंदी-देहू रस्त्यावरील तेथील पेट्रोल पंपापासून जवळच काही अंतरावर असणाऱ्या  पाण्याच्या पाइपलाईनच्या व्हाॅल्व्ह मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे बरेच दिवसापासून दिसून येत आहे.

दि.12 रोजी रविवारी रात्री तेथील वॉटर व्हाॅल्व्ह मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन रस्त्याकडेने दूरवर पाणी  वाहत असल्याचे चित्र दिसून येत होते.तेथील पाण्याची टाकी भरण्यासाठी जलकेंद्रातून तिकडे पाणी जाते तेव्हा तेथील वॉटर व्हाॅल्व्ह मधून पाण्याची गळती  होत असते. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकाने सांगितली.

Mhalunge News : रिल्स’ तयार करण्याच्या नादात जीव गमावला, भामा आसखेड धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

तसेच येथील वॉटर व्हाॅल्व्ह मधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती (Alandi News) होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करणे आवश्यक आहे, असे मत नागरिकाने व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.