Mhalunge News : ‘रिल्स’ तयार करण्याच्या नादात जीव गमावला, भामा आसखेड धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील महंमदवाडी परिसरात भरधाव दुचाकीवर ‘रिल्स’ तयार करण्याच्या नादात दुचाकीच्या धडकेने एका पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना भामा आसखेड धरण (Mhalunge News) परिसरातील करंजविहिरे गावात दुर्घटना घडली. धरणाच्या काठावर थांबून ‘रिल्स’ तयार करणारा तरुण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

दत्ता भारती (वय 24 , सध्या रा. वराळे, मूळ रा. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दत्ता आणि त्याचे वराळे गावातील तीन मित्र शनिवारी (11 मार्च) करंजविहिरे परिसरातील भामा आसखेड धरणावर गेले होते. दत्ता आणि त्याच्या बरोबर असलेल्या मित्रांनी धरणाच्या काठावर दारु प्यायले. त्यानंतर दत्ताने धरणाच्या काठावर थांबून मोबाइलवर ‘रिल्स’ तयार करण्याचा प्रयत्न केला.

 

Alandi : आळंदीमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव संपन्न

त्या वेळी पाय घसरुन दत्ता पाण्यात बुडाला. त्याच्या बरोबर असलेल्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. मित्रांना पोहता येत नसल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. दत्ताचा पाण्यात बुडून (Mhalunge News) मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. दत्ताचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.