Alandi : आळंदीमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी येथे 12 मार्च रोजी (Alandi)  वारकरी साहित्य परिषदेतर्फे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या 2000 विद्यार्थ्यांची वारकरी पारंपरिक वेशात भव्य असा दिंडी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरपासून मावळ तालुका धर्मशाळेपर्यंत काढण्यात आला.

यावेळी आळंदी येथील कबीर मठाचे प्रमुख ह.भ.प.चैतन्य महाराज, कबीर बुवा, ह.भ.प.नरहरी बुवा चौधरी, ह.भ.प. महादेव महाराज शहाबाजकर, ह.भ.प प्रशांत महाराज देहूकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

त्यानंतर मावळ तालुका धर्मशाळेमध्ये ह.भ.प.विठ्ठल पाटील (काकाजी), ह.भ.प.चैतन्य महाराज कबीर बुवा, ह.भ.प नरहरी बुवा चौधरी यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. व तद्नंतर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी नागरिकांच्या तर्फे त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला.

Vadgaon Maval : पाण्याची बचत करणारे स्मार्ट टॉयलेट

तसेच पुणे जिल्ह्याचे कार्यकारणी यांनी सुद्धा त्यांचा (Alandi) सत्कार केला. या कार्यक्रमाची पसायदानाने सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.