Alandi News : आळंदीतील जुन्या बंधाऱ्या वरून ये-जा करणे धोकादायक

एमपीसी न्यूज – सिद्धबेट जवळील बंधारा नागरिकांना ये-जा करण्यासाठी आधीच धोकादायक होता. आता सद्यस्थितीत अजूनही तो पहिल्यापेक्षा जास्त धोकादायक बनला आहे. बंधाऱ्यावरील कर्मचाऱ्यांच्या कामा संदर्भात तसेच त्यांना ये – जा करण्यासाठी  बंधाऱ्यावर बांधण्यात आलेले पक्के सिमेंट काँक्रीट जागो जागी तुटलेले दिसत आहे.

तसेच या बंधाऱ्यावरून लोखंडी पाण्याची पाईप आहे. त्यावरूनच अनेक नागरिक जीवाची पर्वा न करता ये – जा करतात. तसेच मासेमारी करणाऱ्या व्यक्तीही या धोकादायक बंधाऱ्यावरून मासेमारी करताना दिसतात. यंदा पुराच्या पाण्यामुळे सिद्धबेट बंधाऱ्या जवळील डांबरी रस्त्याचा काही भाग वाहून गेला असून तिथे तिथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पालिका कर्मचाऱ्यांसाठी  ये – जा करण्यासाठी, बंधाऱ्यातील दरवाजे बंद करून पाणीसाठा साठून ठेवण्यासाठी व पूर परिस्थिती च्या वेळी पाणी प्रवाह जाण्यासाठी ते उघडण्याच्या कार्यासाठी ,जुने दरवाजे डागडुजी व नवीन दरवाजे बसवण्याकरिता बंधाऱ्यावरील सिमेंट काँक्रीट लहानसा पथ लाभदायी ठरत होता. कर्मचाऱ्यांना ही तिथे कामानिमित्त जीवमुठीत धरून ये – जा करावी लागत आहे.

Kala Kirti Nrutyalaya : विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याने तळेगावकर मंत्रमुग्ध

नगरपालिका प्रशासनाला बंधारा दूरवस्थेबाबत लक्ष देऊन बंधाऱ्याची योग्य ती दुरुस्ती करावी याबाबत सामाजिक संस्थेनी निवेदन ही दिली आहेत. हा बंधारा धोकादायक असून त्यावरून नागरिकांनी ये – जा करू नये अशा प्रकारचा कुठलाही फलक लावण्यात आलेला नाही. काही वर्षांपूर्वी त्या बंधाऱ्या वरून नागरिक ये –  जा करू नये म्हणून पालिकेने दोन्ही बाजूंना लोखंडी जाळी लावण्यात आली होती. ती सुद्धा आता तिथे नाही. बंधाऱ्यावर लोखंडी जाळ्या बसवण्यात येतील व  बंधारा दुरुस्ती बाबत त्या संबंधित वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात आली आहे. बंधारा दुरुस्तीबाबत संबंधित वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी दुरुस्तीसाठी उपाय योजना करतील, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.