Alandi: आळंदी शहरात आज एकूण 6085 बालकांना पोलिओ डोस

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय  पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत  राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने(Alandi) ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन आज 3 मार्च  रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली गेली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आळंदी शहरात विविध ठिकाणी 14 बूथ (Alandi) तसेच मोबाईल टीम शहरात कार्यरत होती.आळंदी शहरात  एकूण 6085 लाभार्थ्यांना पोलिओ डोस पाजण्यात आला.

Pimpri : पॉलिटेक्निक क्रीडा स्पर्धेत पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकचे नेत्रदीपक यश

शहरातील 5 वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस देण्यात आली.राहिलेल्या बालकांना उद्यापासून( दि. 4) (आयपीपीआय अंतर्गत) घरोघरी जाऊन रुग्णालयाच्या टीम लस पाजणार आहेत.याबाबत माहिती ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.यावेळी विविध बूथ केंद्रावर शहरातील मान्यवर लोकप्रतिनिधिनी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.