Alandi : विनोद पगडे निवास ते कोठारी निवासपर्यंतचा रस्ता त्वरित बनविण्याची पालिकेकडे मागणी

एमपीसी न्यूज – आळंदी मधील विनोद पगडे निवास ते कोठारी निवास या गल्लीतील रस्ता अनेक वर्षे (Alandi) बनवलेला नाही.तो दुरवस्थेत आहे. त्या रस्त्याबाबतचे निवेदन तेथील नागरिकांच्या वतीने आळंदी नगरपरिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना देण्यात आले.

Alandi : नीलम गोऱ्हे यांची माऊली मंदिरास सदिच्छा भेट

 

काही वर्षांपूर्वी तेथील रस्ता  सिमेंट काँक्रीट रस्ता नवीन गटार लाईन व पाण्याची पाईप लाईनसाठी उकरण्यात आला होता.त्यानंतर तो कच्चा दुरावस्थेत आहे. त्या रस्त्यामध्ये ठीक ठिकाणी अर्धा एक फूटापर्यंत मोठ्या आकाराचे खड्डे पावसाच्या पाण्याने भरलेले आहे.

महिला ,ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तेथील रस्ता त्वरित बनविण्यात यावा, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले असल्याची माहिती संकेत वाघमारे यांनी (Alandi) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.