Alandi : नीलम गोऱ्हे यांची माऊली मंदिरास सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – आज दि.31 रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी माऊलींच्या ( Alandi ) मंदिरास सदिच्छा भेट दिली.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे व श्री सिद्धेश्वराचे यावेळी त्यांनी दर्शन घेतले. मंदिरामध्ये देवस्थान व्यवस्थापक,शिवसेना शिंदे गट पदाधिकारी कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी त्यांना आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखडातील (सिध्दबेट व इतर ) माहिती देत त्यातील त्रुटी सांगण्यात आल्या.त्याबाबत सरकारचे मी निश्चित लक्ष वेधेन व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलेन.लसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ही या विषयावर  लक्ष असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.
अर्जुन मेदनकर व देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दर्शनबारी संदर्भात समस्येवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच त्या विषयी अधिक बोलताना त्या म्हणाल्या ,.दर्शनबारी जागा न्याय प्रविष्ट आहे.दर्शन बारी जागे संदर्भात कोणी योजना   आखली असेल , जागेची उपलब्धता करून घेणे व त्या  दर्शनबारीत अजून कोणती आधुनिकता  वापरता येईल हे पाहणे गरजे आहे. त्या संदर्भात राजकीय नेतृत्वांनी जर एकमत केले की समाज एकमत होईल. यावेळी पंढरपूर येथील दर्शनबारीचे उदाहरण  त्यांनी दिले.

इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने इंद्रायणी नदी प्रदूषणबाबत केलेले साखळी उपोषण व इंद्रायणी प्रदूषण ही बाब किती गंभीर आहे याबाबत त्यांना सांगण्यात आले. यावर त्या म्हणाल्या, राज्य शासनाने सातत्याने यात लक्ष घातले असले तरी मोठ्या प्रमाणावर मैला विसर्जन होत आहे.
त्या मैलावर प्रक्रिया करण्याची आधुनिक सामुग्री उपलब्ध नसल्याने त्याच्यासाठी आर्थिक प्रावधान केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी केले तर, त्यामध्ये फरक होईल. त्या दृष्टीकोनातून योजना आखल्या आहेत. अजून मोठ्या प्रमाणात प्रयत्नांची गरज आहे.
यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे,  राहुल चव्हाण,  संकेत वाघमारे, संगिता फफाळ, मंगला हुंडारे व इतर मान्यवर पदाधिकारी ,
पोलीस अधिकारी पृथ्वी पाटील,मच्छींद्र शेंडे,जालिंदर जाधव,जोंधळे साहेब उपस्थित ( Alandi ) होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.