Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पुणे पोलिसांनी बजावली नोटीस

एमपीसी न्यूज -पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने उद्या (Pune) गौरविण्यात येणार आहे. तसेच मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दोन्ही गटाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोदी यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पाटील यांनी गो बॅक प्राईम मिनिस्टर अशा घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. तर भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनी देखील आंदोलनाला आंदोलनाने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

Pimpri : शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार, 3 हजार नागरिकांची उपस्थिती

दोन्ही बाजूने सुरु असलेल्या या घडामोडी पाहता पुणे पोलीस अलर्टवर आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय (Pune) घेतला आहे. पुणे पोलिसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलनाचा इशारा दिल्याने पुणे पोलिसांची प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांची प्रशांत जगताप यांना आंदोलन न करण्याची नोटीस बजावली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 149 नुसार पुणे पोलिसांनी प्रशांत जगताप यांना नोटीस बजावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्ष उद्या पुणे शहरात आंदोलन करणार आहेत. त्याच अनुषंगाने आंदोलनकरता कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून नोटीस (Pune) बजावण्यास सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.